News Media

श्री गंगा हॉस्पिटलमध्ये भिन्न रक्तगटाचे यशस्वी किडनी प्रत्यारोपण

नांदेड येथील श्री गंगा हॉस्पिटलमध्ये भिन्न रक्तगट असलेल्या रुग्णाचे यशस्वी किडनी प्रत्यारोपण करण्यात आले आहे. किडनी निकामी झाल्यामुळे रुग्णाला डायलिसिसवर अवलंबून राहावे लागत होते. मात्र योग्य रक्तगटाचा दाता न मिळाल्याने...

श्री गंगा हॉस्पिटलमध्ये भिन्न रक्तगटाचे यशस्वी किडनी प्रत्यारोपण

नांदेड येथील श्री गंगा हॉस्पिटलमध्ये भिन्न रक्तगट असलेल्या रुग्णाचे यशस्वी किडनी प्रत्यारोपण करण्यात आले आहे. किडनी निकामी झाल्यामुळे रुग्णाला डायलिसिसवर अवलंबून राहावे लागत होते. मात्र योग्य रक्तगटाचा दाता न मिळाल्याने उपचारात अडचणी येत होत्या.

अशा परिस्थितीत डॉक्टरांनी आधुनिक ‘ABO incompatible kidney transplant’ पद्धतीचा अवलंब केला. प्रत्यारोपणापूर्वी रुग्णाच्या शरीरातील अँटीबॉडी कमी करण्यासाठी विशेष इंजेक्शन आणि प्लाझ्मा एक्सचेंज प्रक्रिया करण्यात आली. या उपचारांनंतर प्रत्यारोपण यशस्वीरित्या पार पडले.

शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची प्रकृती सुधारत असून त्याला नवजीवन मिळाले आहे. काही दिवसांच्या उपचारानंतर रुग्णाला रुग्णालयातून सुटी देण्यात आली.

या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे वैद्यकीय क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले असून, भिन्न रक्तगट असतानाही किडनी प्रत्यारोपण शक्य असल्याचा संदेश समाजात गेला आहे. रुग्णाच्या कुटुंबीयांनी डॉक्टरांचे व रुग्णालयाच्या टीमचे आभार मानले आहेत.