नांदेडमध्ये आईच्या ममतेचे भावनिक उदाहरण समोर आले आहे. आईने स्वतःची किडनी दान करून आपल्या मुलाला पुनर्जन्म दिला आहे. मुलाची प्रकृती अत्यंत गंभीर होती, कारण त्याची किडनी पूर्णपणे निकामी झाली होती.
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार किडनी प्रत्यारोपण करण्याचा निर्णय घेण्यात आला. नांदेडमधील श्री गंगा हॉस्पिटल येथे तज्ञ डॉक्टरांच्या टीमने ही शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडली.
शस्त्रक्रियेनंतर आई आणि मुलाची प्रकृती स्थिर असून दोघेही उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहेत. या घटनेमुळे अवयवदानाचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.